प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

लॉकडाऊन नियमांत शिथीलता दिल्यानंतर व्यवहार पुर्ववत होत आहेत. कोरोनाकाळातील कडक निर्बंधामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील काही प्रमाणात कमी झाली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्याने लॉकडाऊन नियमांत शिथीलता देण्यात येत असल्याने  रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे.

  पुणे :  मुंबई – पुणे महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांना आळा घालून होणारे अपघात रोखण्यासाठी आरटीओच्या वायुवेग पथकाने धडक मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली. संपुर्ण महामार्गावर प्रभावी कारवाईसाठी सोमवार ते शनिवार या पाच दिवसांच्या मोहीमेत पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल आणि पेन या कार्यालयातील स्कॉड रस्त्यावर उतरले होते. यामध्ये लेन कटींग करणाऱ्या ५३३ तर, मर्यादापेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणाऱ्या ११४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय इतर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून मागील सलग पाच दिवस ही मोहीम सुरू होती.

  लॉकडाऊन नियमांत शिथीलता दिल्यानंतर व्यवहार पुर्ववत होत आहेत. कोरोनाकाळातील कडक निर्बंधामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या देखील काही प्रमाणात कमी झाली होती. परंतु मागील काही महिन्यांपासून टप्प्याटप्याने लॉकडाऊन नियमांत शिथीलता देण्यात येत असल्याने  रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. मुंबई – पुण्याला जोडणाऱ्या महत्वाच्या असलेल्या एक्स्प्रेसवेवर देखील वाहनांची वर्दळ व्ोाढली आहे.  यातच महामार्गावर काही बेशिस्त वाहनधारकांकडून सर्रासपणे नियमभंग करण्यात येत असल्याने होणारे अपघात चिंतेचा विषय बनत चालला आहे. विशेषतः लेन कटींगमुळे अपघाताचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, ड्रायव्हींग करतेवळी मोबाईल फोनचा वापर करणे, विना सीटबेल्ट, इंडिकेटरचा वापर न करणे यांसह अन्य कारणांमुळे अपघात घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या  सूचनेनूसार आरटीओच्या पथकाने  ५ ते १० जूलै या पाच दिवसांच्या कालावधीत महामार्गावर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली होती. संपुर्ण महामार्गावर प्रभावी कारवाई व्हावी, यासाठी पुणे, पिंपरी चिंचवड, पनवेल आणि पेन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. पथकाने महामार्गावर गस्त घालत कारवाई केली. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती िंपपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली.

  पाच दिवसातील काही प्रमुख कारवाया  
  नियमभंगाचा प्रकार                    –  केलेली कारवाई
  मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणे      – ११४
  लेन कटींग                               –  ५३३
  ओव्हरलोडींग                            –   ४४
  फोनवर बोलत वाहन चालविणे        –     ४
  रिफ्लेक्टर नियमांचा भंग                –    ८०
  विना सिटबेल्ट वाहन चालविणे        –     ८
  नो एंट्रीतून प्रवेश                         –    ३

  मुंबई - पुणे महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांवर धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. स्कॉडच्या माध्यमातून सलग पाच दिवस ही कारवाई करण्यात आली.

  - डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त, मराहाष्ट्र राज्य