Are they in a dream? Chandrakant Patil criticizes Supriya Sule

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सुप्रिया सुळेंना चांगलाच टोला लगावला . ”त्या स्वप्नात आहेत का? असे म्हणत पाटील यांनी सुप्रिया सुळेना चिमटा काढला.

पुणे : भाजप नेते आणि महाविकास आघाडीतील नेते यांच्यात सुरु असलेला आरोपप्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांच्यात जबरदस्त टोलेबाजी झाली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत पत्रकारांनी पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सुप्रिया सुळेंना चांगलाच टोला लगावला . ”त्या स्वप्नात आहेत का? असे म्हणत पाटील यांनी सुप्रिया सुळेना चिमटा काढला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजीत कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावा ही आमची सुरूवातीपासूनची मागणी असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

“राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही,” अस म्हणत महाविकास आघाडीच्या  वर्षपूर्ती बाबातही पाटील यांनी भाष्य केले.