crime

लोणावळ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (73) यांच्या प्रधान पार्कमधील बंगल्यावर 10 ते 12 जणांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून, गळ्याला धारदार शस्त्र लावून सुमारे 67 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

    लोणावळा : लोणावळ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. हिरालाल जगन्नाथ खंडेलवाल (73) यांच्या प्रधान पार्कमधील बंगल्यावर 10 ते 12 जणांनी सशस्त्र दरोडा घातल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी डॉक्टर व त्यांच्या पत्नीचे हातपाय बांधून, गळ्याला धारदार शस्त्र लावून सुमारे 67 लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

    यात 50 लाखांची रोकड व 17 लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. या घटनेमुळे लोणावळा शहर व परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान 10 ते 12 दरोडेखोरांनी खंडेलवाल यांच्या बंगल्यात दरोडा टाकला.

    हे सुद्धा वाचा