पुण्यात सशस्त्र दरोडा : मारहाण करून घर लुटले ;  घटनेने  खळबळ

तक्रारदार वडकी गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ राहतात. दरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर हातात कोयते व काठ्या घेऊन घरात शिरले. त्यांनी शस्त्रचा धाक दाखवत मारहाणकरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तेलाचे डब्बे व फोन असा ऐवज चोरला. मदतीसाठी कोणीही येऊ नये म्हणून या दरोडे खोरांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या.

    पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोयते आणि काठ्या हातात घेऊन घरात शिरलेल्या दोरडेखोरांनी सोन्याचे दागिने, तलाचे डबे व रोकड नेण्यात आली आहे. या घटनेने लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार वडकी गावात ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ राहतात. दरम्यान मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दरोडेखोर हातात कोयते व काठ्या घेऊन घरात शिरले. त्यांनी शस्त्रचा धाक दाखवत मारहाणकरून सोन्याचे दागिने, रोख रक्कम, तेलाचे डब्बे व फोन असा ऐवज चोरला. मदतीसाठी कोणीही येऊ नये म्हणून या दरोडे खोरांनी शेजाऱ्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या होत्या. दरोडेखोर गेल्यानंतर कुटुंबाने बाहेर आले आणि त्यानंतर हा दरोड्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने गावात दहशत पसरली आहे.