घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक ; लाखोंचा मुद्देमाल जप्त

आरोपींना पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, निखील पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, रोहीदास पारखे, राजेश दराडे आणि दिगंबर साळुंके यांचे पथक तयार करण्यात आले.

    लोणी काळभोर : हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, घरफोडी आणि जबरी चोरी या सारखे गंभीर गुन्हे करणार्‍या तीन चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी (ता.२४) रात्री अटक करण्यात आली  आहे. त्यांच्याकडून ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने, एक एलईडी.टिव्ही, एक डि.व्ही आर, दोन मोबाईल, एक कार आणि एक मोटार सायकल असा एकूण सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    जयसिंग काळुसिंग जुनी (वय २८, .रा. सर्वे नं.८६, बिराजदार नगर, वैदवाडी, हडपसर) सोमनाथ नामदेव घारूळे (वय २४ ) आणि बल्लुसिंग प्रभुसिंग टाक (वय २४ वर्षे, रा. सर्वे नं. ११० रामटेकडी) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

    लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड महामार्गावर संदीप चिंचुरे आणि त्यांचे साथीदार ऊरुळी देवाची गावातून जात असताना, अचानक तेथे सॅन्ट्रो कारमधुन आलेल्या तीन अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील दोन मोबाईल चोरून नेले होते. तसेच ऊरुळी देवाची,हांडेवाडी आणि मंतरवाडी परिसरात अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी करण्याचे सत्र सतत चालू ठेवले होते. याची दखल घेत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खून, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, बेकायदेशीर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणा-या या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले.

    त्यानुसार, आरोपींना पकडण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, गणेश सातपुते, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, निखील पवार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, रोहीदास पारखे, राजेश दराडे आणि दिगंबर साळुंके यांचे पथक तयार करण्यात आले.