आदिवासी महिलांना गंडा घालणाऱ्या भामट्यास अटक

सदर प्रकरणात जुन्नर पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केल्याने जि.प.माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवराम लांडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल लांडे व सर्व महिलांनी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

    जुन्नर :जनसेवा लघु उद्योग विकास महाराष्ट्र या नावाने आदिवासी भागातील बचत गटाच्या महिलांना हळद पावडर, मिरची पावडर, जिरे, मोहरी वगैरे वस्तूंची अर्धा अर्धा किलो पॅकिंग करून द्यायची आहे कच्चा पिशव्या आम्ही देणार असे म्हणून कंपनीत रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रत्येकी तीनशे रुपये लाटल्या प्रकरणी तातडीने कारवाई करत जुन्नर पोलिसांनी बीड येथून भामट्यास अटक केली आहे.तांबे येथील सुरेखा महेंद्र मडके यांनी या फसवणूक प्रकरणी फिर्याद दिली होती.आरोपी नामे किशोर काळे व इतर दोन इसम व दोन महिला सहभागी आहेत हे मिळून मोबाईल द्वारे संपर्क साधून फसवणुकीची काम करत आहेत यातील आरोपी नंबर एक यास माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे,तसेच जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पाटील, महिला पोलीस हवालदार मनीषा ताम्हाणे,पोलीस अंमलदार अमोल शिंदे, पोलीस अंमलदार भरत सूर्यवंशी यांनी बीड जिल्हा येथे जाऊन आरोपी नंबर एक किशोर वशिष्ठ काळे यास मोबाईल लोकेशन द्वारे शिताफीने पकडून त्यास आज दि १८ रोजी जुन्नर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समक्ष हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    दरम्यान, सदर प्रकरणात जुन्नर पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केल्याने जि.प.माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य देवराम लांडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल लांडे व सर्व महिलांनी पोलीस निरीक्षक विकास जाधव यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

    सदर घटनेचा जुन्नर पोलीस स्टेशनकडून कसोशीने तपास चालू आहे, या फसवेगिरी मध्ये किती आरोपी सहभागी आहे,त्याचा तपास सुरू आहे.तसेच जुन्नर परिसरामध्ये अशाप्रकारे फसवेगिरी चे प्रकार घडले असतील तर जुन्नर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा

    विकास जाधव,पोलीस निरीक्षक, जुन्नर