Graduate Constituency Election Result :  पुण्यातून अरुण लाड आणि  जयंत आसगांवकर आघाडीवर

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमाेजणी सुरू झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांनी आघाडी घेतली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ६२ उमेदवार असल्याने या मतपत्रिकेचा आकार माेठा आहे.

पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमाेजणी सुरू झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार महाविकास आघाडीचे अरुण लाड आणि जयंत आसगांवकर यांनी आघाडी घेतली आहे.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ६२ उमेदवार असल्याने या मतपत्रिकेचा आकार माेठा आहे. तसेच २लाख ४७ हजार ५० मतदारांनी मतदान केले आहे. या मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चालले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमाेजणी सुरू झाली असुन, पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आघाडी घेतली आहे. तर शिक्षक मतदारसंघात जयंत आसगांवकर यांनी आघाडी घेतली आहे.

सहा वाजेपर्यंत प्राथमिक कलानूसार पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड व शिक्षकमध्ये काॅग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर होते. हाच ट्रेंड राहिल्यास दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करु शकतात. मतमोजणी उशीरापर्यंत चालू शकते. शिक्षकचा निकाल अगोदर अपेक्षित आहे.दरम्यान एकाचवेळी पहिल्या पसंतीची मते व कोटा निश्चित करण्याचे काम सुरू आहे.