शिक्षण समिती सदस्यपदी तुषार हिंगे यांची निवड

शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात भाजपच्या माया बारणे यांचा समावेश होता. मात्र, त्यांनी जानेवारी महिन्यात वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर हिंगे यांची निवड करण्यात आली.

     

    पिंपरी: महापालिका शिक्षण समिती सदस्यपदाचा माया बारणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांची मंगळवारी  निवड करण्यात आली. शिक्षण समितीची मुदत जुलै महिन्यात संपली होती. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे नवीन सदस्यांची निवड झाली नव्हती. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी शिक्षण समिती सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात भाजपच्या माया बारणे यांचा समावेश होता. मात्र, त्यांनी जानेवारी महिन्यात वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर हिंगे यांची निवड करण्यात आली. सद्यस्थितीत शिक्षण समितीत सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे तीन आणि शिवसेनेचा एक असे नऊ सदस्य आहेत.