आषाढी वारी; देहू, आळंदीत संचारबंदी घोषित

पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे.

    पिंपरी-चिंचवड : देहू, आळंदी संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 जून ते 4 जुलै 2021 पर्यंत संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये देहू, आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद राहणार आहे. दरम्यान, देहू, आळंदी परिसरातील स्थानिक नागरिकाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला राहणार आहे.

    पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे.

    गतवर्षीप्रमाणे पालखी सोहळा एसटीमधून आणा स्वागत करुयंदाही गत वर्षीप्रमाणे एसटी बसमधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा, आम्ही एसटीतून आलेल्या पालखी सोहळ्याचं स्वागत करु, असं वाखरी ग्रामस्थ म्हणाले.