नीट परीक्षेत आशिष झानते पहिला, तर पुण्याचा तेजोमय वैद्य राज्यात दुसरा

नटीएकडून (NTA) वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या पात्रता परीक्षेचा निकाल काल शुक्रवारी जाहीर (RESULT DECLARE)करण्यात आला. यामध्ये आशिष झानते (Ashish Jhante) याने ७२० पैकी ७१० गुण प्राप्त करून देशात १९ वा क्रमांक मिळवला आहे. तर पुण्याचा तेजोमय वैद्य (Tejomay Vaidya) याने ७०५ गुण घेऊन राज्यात दुसरा, तर देशात ४३ वा क्रमांक पटकावला आहे. तेजोमाय हा फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

पुणे : एनटीएकडून (NTA) वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या पात्रता परीक्षेचा निकाल काल शुक्रवारी जाहीर (RESULT DECLARE)करण्यात आला. यामध्ये आशिष झानते (Ashish Jhante) याने ७२० पैकी ७१० गुण प्राप्त करून देशात १९ वा क्रमांक मिळवला आहे. तर पुण्याचा तेजोमय वैद्य (Tejomay Vaidya) याने ७०५ गुण घेऊन राज्यात दुसरा (Second Rank)  , तर देशात ४३ वा क्रमांक पटकावला आहे. तेजोमाय हा फर्ग्युसन महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

वैद्य कुटुंबीयांचे स्वतःचे खाजगी हॉस्पिटल असल्यामुळे इयत्ता नववी पासूनच आपणही डॉक्टर व्हावे,असे तेजोमयला वाटू लागले. तेजोमयची आई डेंटिस्ट तर वडील ऑर्थोपेडिक्स आहेत. कोरोनामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेल्या नीट परीक्षेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत यश मिळाले, असे तेजोमय म्हणाला.

पुढे तेजोमयने सांगितले की, घरात सर्वच डॉक्टर असल्यामुळे आपणही डॉक्टर म्हणून करिअर करावे, असे इयत्ता आठवी ,नववी पासून वाटू लागले. त्यामुळे मी त्यादृष्टीने अभ्यासाला सुरुवात केली. दररोज ज्या विषयाचा अभ्यास केला; तो शांतपणे आणि काळजीपूर्वक केला.