राज्याचे प्रश्न कोमात आणि स्व:बळाची छमछम जोरात, आशिष शेलारांनी लगावला टोला

राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाने दिली. कर्जमुक्ती, पीकविमा, वादळामुळे झालेले नुकसान भरपाई, महिला अत्याचार, सायबर क्राईम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पोलिसांकडून वसूलीचे काम करत आहे. बारा बलूतेदार, अलुतेदार यांना मदत दिली नाही. पोलीस दल आपापसातील गँगवारमध्ये विखुरलेले दिसत आहे. ज्या केसेस समोर येत आहेत त्यात माजी गृहमंत्री फरार दिसत आहेत. असे आशिष शेलार म्हणाले. 

    राज्याचे प्रश्न कोमात आणि स्व:बळाची छमछम जोरात, अशी टीका भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकासआघाडीवर केली आहे. पिंपरीमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, महापौर माई ढोरे, माजी खासदार अमर साबळे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे आदी उपस्थित होते.

    राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाने दिली. कर्जमुक्ती, पीकविमा, वादळामुळे झालेले नुकसान भरपाई, महिला अत्याचार, सायबर क्राईम याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकार पोलिसांकडून वसूलीचे काम करत आहे. बारा बलूतेदार, अलुतेदार यांना मदत दिली नाही. पोलीस दल आपापसातील गँगवारमध्ये विखुरलेले दिसत आहे. ज्या केसेस समोर येत आहेत त्यात माजी गृहमंत्री फरार दिसत आहेत. असे आशिष शेलार म्हणाले.

    पुढे म्हणाले की, ओबीसींच राजकीय आरक्षण हे सरकार टिकवू शकलं नाही. मराठा आरक्षण जे फडणवीस सरकारने दिलं होतं ते यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. तसेच, अशा अनेक समस्यांमुळे राज्यातील जनता कोमात आहे. तर, जोमात केवळ स्व:बळाची छमछम आहे. असा टोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला.