अबब ! पूलाच्या बांधकामापेक्षा डांबरीकरणाची उंची अधिक

- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यात अनियमता (वरवंडमधील प्रकार) दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड हद्दीतील सातपुतेमळाकडे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या काम पुलाच्या उंची पेक्षा डांबरीकरणाची उंची

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यात अनियमता (वरवंडमधील प्रकार) 

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड हद्दीतील सातपुतेमळाकडे रस्त्याच्या डांबरीकरणाच्या काम पुलाच्या उंची पेक्षा डांबरीकरणाची उंची तीन ते चार इंचांनी अधिक झाल्याने रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमता झाली आहे, सबंधित अभियंता व ठेकेदारा यांचे आर्थिक संबंध असल्याची चर्चा परिसरात जोमात चालू आहे,

    वरवंड येथील राष्ट्रीय महामार्ग ते सातपुतेमळामधील दोन हजार तीनशे पन्नास मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन १ कोटी २० लाख ८१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता, यामध्ये पाच पूल (मोऱ्या) चे नवीन बांधकामासहित रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले होते, यावेळी मार्च २०१९ ते जानेवारी २०२० या नऊ महिन्याच्या कालावधीत रस्ता डांबरीकरणाचे काम केडगाव येथील मे. कोकरे ब्रदर्स या कंपनीला देण्यात आले होते, पुढील पाच वर्षे रस्ता देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार यांना ६ लाख ३८ हजार रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे,

    रस्त्याचे काम करत असताना संबंधित ठेकेदारानी चांगल्या दर्जाचा मुरूमाचा वापर करणे आवश्यक असताना व साईट पट्टीवरील मुरूम यांत्रिक मशीन दाबणे (रोलिंग) बंधनकारक असताना संबंधित ठेकेदाराने माती मिश्रित मुरूमाचा वापर करत रोलिंग करण्यास बगल दिली आहे, यामुळे अनेक ठिकाणचा मुरूम पावसाने वाहून गेला आहे, रस्त्याच्या डांबरीकरणातील सर्वात वरील भागावरील कारपेट व सीलकोटचा २० मी.मी.च्या स्थल रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात ठेकेदाराने घोळ केला असल्याने काही महिन्यातच रस्ता उखडला आहे, 

यासर्व प्रकरणात अभियंता अभिजित मुंडे यांचे हात चांगलेच लाल झाले असल्याने ठेकेदाराच्या नियमबाह्य कामावर अभियंता यांनी चांगली मोहर लावली असल्याचे आरोप नागरिक करत आहेत, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन केलेल्या डांबरीकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची टीका केली जात आहे, 

या प्रकरणावर मुख्यमंत्री ग्राम सडकचे कनिष्ठ अभियंता अभिजित मुंडे व मुख्य अभियंता कविता देवरे यांना संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत,दरम्यान, वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रस्त्याच्या डांबरीकरणाची व पुलाच्या बांधकामाची तपासणी करावी व कामात हलगर्जीपणा झालेला असल्यास मुख्य व कनिष्ठ अभियंता यांना जवाबदार धरून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.