चांडोली खुर्द येथे जनावरांसाठी ठेवलेल्या चाऱ्याची वळई पेटविली

मंचर : आंबेगाव तालुक्यातील चांडोली खुर्द- पोखरकर मळा येथील शेतकरी चंद्रकांत तात्याबा पोखरकर यांनी  जनावरांसाठी ठेवलेल्या चाऱ्याची गंजी, वळई अज्ञात व्यक्तीने पेटविल्याने संबधित शेतकऱ्यांचे सुमारे ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई तातडीने मिळावी,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.वळईला लावलेल्या आगीमध्ये सुमारे ८०० पेंढ्या कडबा व २ हजार पेंढ्या वैरण जळुन भस्मसात झाली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर कुटुंबाचा उदरनिर्वाह गाईंवर अवलंबून आहे. नुकसानग्रस्त ठिकाणी पोलीस पाटील लहू इंदोरे, उपसरपंच संदीप वाबळे यांनी भेट दिली. गाव कामगार तलाठी नंदाराम आदक यांनी पंचनामा केला आहे. नुकसान भरपाई तातडीने मिळावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.