onion

ता.जुन्नर (Junner) येथे आपल्या शेतात असलेल्या कुलूप बंद कांदाचाळीत  साठवलेल्या १०७ भरलेल्या गोण्यांपैकी ५८ गोण्या इतका कांदा चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.  याबाबत वरद विष्णु देसाई(रा.डिंगोरे मराडवाडी,ता.जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३८०,४६१ नुसार गुन्हा दाखल केला.

 

ओतूर, डिंगोरे : ता.जुन्नर (Junner) येथे आपल्या शेतात असलेल्या कुलूप बंद कांदाचाळीत  साठवलेल्या १०७ भरलेल्या गोण्यांपैकी ५८ गोण्या इतका कांदा चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.  याबाबत वरद विष्णु देसाई(रा.डिंगोरे मराडवाडी,ता.जुन्नर) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी भा.दं.वि.कलम ३८०,४६१ नुसार गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी(दि.२१)सांयकाळी ५ वा. चे सुमारास देसाई यांच्या शेतजमिन गट क्र.९८२ मध्ये उत्पादित केलेल्या कांद्याचे पिक काढुन ते गोण्यांमध्ये भरुन त्या एकूण कांद्याच्या १०७ गोणी शेतात असलेल्या बराखीमध्ये कुलूपबंद करुन सांयकाळी  ६/३० वा.चे सुमारास देसाई घरी निघुन गेले त्यानंतर गुरुवारी (दि.२२) पहाटे ५ वा.चे सुमारास कांद्याच्या बराखीमध्ये भरुन ठेवलेल्या गोण्या पाहण्यासाठी ते गेले  तेव्हा बराखीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत  दिसल्याने बराखीतील कांद्याच्या गोणी मोजुन बघीतल्या असता त्यामध्ये चालु बाजारभावाप्रमाणे २ लाख ३५ हजार रुपये किंमतीच्या ५० ते ५५ किलो क्षमता असलेल्या एकुण ५८ कांद्याच्या भरलेल्या गोणी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. देसाई यांनी परिसरात कांदा गोण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना त्या कोठेही मिळुन आल्या नाहीत.त्यामुळे त्यांनी ओतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचे विरुद्ध तक्रार दिली आहे .

सध्या कांद्याचे भाव प्रति किलो ८० रुपयाच्या पुढे गेल्याने तालुक्यात काही ठिकाणी कांदा चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीतही जीवापाड जपवणूक केलेल्या कांद्यावर चोरटे डल्ला मारू लागल्यामुळे शेतकरी भलतेच धास्तावले आहेत.