राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले

राहुरी : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शनिवारी १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर गेल्या तीन दिवसापूर्वी रोहिदास नगर परिसरात राहणाऱ्या 3२ वर्षांचा युवक कोरोना बाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले, त्यानंतर कोरोना कमिटी आणि स्थानिक आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेत गावातील बाधितांच्या संपर्कातील दोन दिवसात सुमारे ७२ जणांची रॅपीड चाचणी घेतली आणि या तपासणीत तब्ब्ल १९ रुग्ण बाधित असल्याचे तपासणी दरम्यान निष्पन्न झाले तर तालुक्यात अण्य गावात १९ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत

गेल्या तीन दिवसापूर्वी गावातील रोहिदास नगर परिसरातील एकाला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर आरोग्य विभामार्फत परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या १२ जणांची तपासणी केली असता त्यात सहा पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले, हे रुग्ण सापडल्यानंतर मात्र कोरोना कमिटी आणि स्थानिक आरोग्य विभागाची झोप उडाली, लगेचच गुहा येथील आरोग्य केंद्रामार्फत गावात अँटीजेन रॅपिड टेस्टची मोहीम हाती घेत आज तब्ब्ल ६०जणांच्या तपासणी करण्यात आल्या, सकाळी ११ वाजता सुरू झालेली तपासणी मोहीम दुपारी पर्यंत सुरू होती. या तपासणीमध्ये ग्रामपंचायत परीसर आणि रोहिदास नगर परिसरातील व्यक्तींसह तब्ब्ल १३ रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत, त्यापैकी एक रुग्ण हा गणेगाव येथील होता मात्र त्याची तपासणी कोल्हारमध्ये झाल्याने त्याची नोंदणी ही गावातच झाली. येथील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीचा विचार करता ही साखळी तोडण्याच्या दृष्टीने स्थानिक कोरोना कमिटी ने गावातील मेडिकल आणि दवाखाने सोडून सर्व व्यवहार २८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कोरोना कमिटी चे प्रमुख सरपंच प्रकाश पाटील यांनी दिली.

” गावात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी ग्रामस्थांनी घाबरून न जाता सर्दी, खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तात्काळ स्थानिक आरोग्य केंद्रात संपर्क करावा,मात्र सार्वजनिक ठिकाणी कामापेक्षा जास्त वेळ थांबू नये, तोंडावर नेहमी मास्क चा वापर करावा.”
-डॉ गौतम शिरसाठ , आरोग्य अधिकारी