वैशाखखेडे येथे शेतकऱ्यांच्या सुमारे २ लाखाच्या मोटारींची केबल चोरीला 

नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील वैशाखखेडे येथील शेतकऱ्यांच्या सुमारे २ लाख किंमतीच्या पाण्याच्या मोटारींची कॉपर केबल अज्ञात चोरट्यानी आज दि ११ मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेल्या असल्याची माहिती पोलीस पाटील गणेश शिंदे यांनी दिली आहे .

वैशाखखेडे येथील पिराजी टाकळकर ,रघुनाथ शिंदे ,वैशाखखेडे गावचे पोलीस पाटील गणेश शिंदे ,मेघराज टाकळकर ,सीताराम टाकळकर,महादू कोकणे ,सीताराम गुंजाळ , सदाशिव साठे ,लक्ष्मण नागुर्डे ,मच्छिन्द्र साठे ,सुरेश गुंजाळ ,आदी २५ ते ३० शेतकरी आज दि ११ सकाळी ९ वा कुकडी नदीच्या किनारी असलेल्या मोटारी चालू करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी मोटारीचे विद्युत कनेक्शन साठी जोडलेल्या कॉपरच्या जाड वायरी तुटलेल्या अस्वस्थेत दिसून आल्या.

यामध्ये वैशाखखेडे,मोकासबाग, कोलती ,नेहरकरवाडी ,१४नंबर,नगदवाडी , शिंदेमळा, लेंडस्थळ व परिसरातील ४० ते ५० शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी त्या ठिकाणी आहेत .कुकडी नदीवर शेतीच्या पाणी व्यवस्थापणासाठी शेतकऱ्यांच्या मोटार असून या ठिकाणी मोटारीच्या केबल चोरीला जाण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सातत्याने सुरु आहेत .आज मात्र २५ ते ३० शेतकऱ्यांच्या एकाच वेळी केबल चोरीला जाण्याचा मोठा प्रकार घडला आहे .या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .एका शेतकऱ्याची किमान ३०० फूट ते ७०० फूट कॉपर केबल मोटारीला जोडली होती .या केबल चोरांचा शोध घेऊन  कडक कारवाई करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. फोटो – वैशाखखेडे येथे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारींची कॉपर केबल अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या.