प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सौरभ अडागळे याचे फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, मुलीच्या मनात त्याच्याविषयी प्रेम नसल्याने तिने नकार दिला. त्याचा राग मनात ठेवत रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभने फिर्यादीच्या घरासमोर आरडाओरडा करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

    पुणे : प्रेमास नकार दिल्याच्या कारणावरुन टोळक्याने तरूणीच्या वडीलांवर कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला. त्याशिवाय तरूणीसह तिच्या बहिणीलाही मारहाण केली आहे. याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    ही धक्कादायक घटना रविवारी रात्री हडपसरजवळील काळेपडळमधील नेहरु पार्क गल्लीमध्ये घडली. सौरभ अडागळे, सागर अडागळे, ओम भोसले व रोहीत भोसले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    सौरभ अडागळे याचे फिर्यादीच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र, मुलीच्या मनात त्याच्याविषयी प्रेम नसल्याने तिने नकार दिला. त्याचा राग मनात ठेवत रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सौरभने फिर्यादीच्या घरासमोर आरडाओरडा करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

    त्यामुळे ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना सौरभ व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस अडवून हातातील कोयत्याने वार केला. लाथाबुक्क्यांसह दगडांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या दोन्ही मुलींनाही जबर मारहाण केली.