दौंड तालुक्यातील शेतकरी आणि घरगुती यांची वीज जोड बंद केल्याच्या निषेधार्थ प्रहार आक्रमक !

सात दिवसाच्या आत शेतकर्‍यांची आणि घरगुती विज जोडून द्यावी अन्यथा वीज जोड बंद केल्याच्या निषेर्धात तसेच महाराष्ट्र राज्य सरकार आणि महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी यांना ईश्वर सदबुद्धी देवो यासाठी (ता.२३) रोजी सकाळी ११ वाजता दौंड उपविभाग महावितरण कार्यालय समोर दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्ष जागरण गोंधळ घालणार आहे असा इशारा यावेळी रमेश शितोळे अध्यक्ष प्रहार जनशक्ति पक्ष दौंड यांच्या वतीने देण्यात आला आहे

    पारगाव : दौंड तालुक्यात गेली ८ दिवसापासुन विद्युत महावितरण कार्यालयाच्या वतीने शेतकर्‍यांची आणि घरगुती वीज जोड बंद करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.

    तसेच गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांवर अस्मानी,सुलतानी संकट कोसळत आहे.गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि यावर्षी कोरोनाची महामारी यामुळे शेतकरी पुरता कोलमडून पडला आहे.अशा परिस्थितीत पीके काढणीला आली असुन,विजेअभावी पिके जळून चालली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याची भूमिका जर महावितरण कंपनी शेतकऱ्यांची वीज बंद करत असेल तर हा शेतकर्‍यांवर खुप मोठा अन्याय आहे आणि तो अन्याय प्रहार जनशक्ती पक्ष कदापिही सहन करणार नाही अशी माहिती यावेळी तालुकाध्यक्ष रमेश शितोळे यांनी दिली आहे.