वाकड येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलाला अटक  

अल्पवयीन मुलाने हिताची बॅंकेच्या एटीएममधील रकमेची चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन येथील बाहेरील बाजूचा पत्रा उचकटला. एटीएम मशीनचे नुकसान करून पैशांची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करीत होता.

    पिंपरी:अल्पवयीन मुलाने  एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. वाकड येथील अष्टविनायक कॉलनी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस फौजदार धर्मराज जनार्धन आवटे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने हिताची बॅंकेच्या एटीएममधील रकमेची चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशीन येथील बाहेरील बाजूचा पत्रा उचकटला. एटीएम मशीनचे नुकसान करून पैशांची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करीत होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बालकाला ताब्यात घेतले आहे.