On the one hand the joy of being kissed and on the other hand the wife understood the news of her husbands death during the presentation

पुण्यातील प्रसिद्ध व्यवसायिक ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (Balwant Marathe) यांंनी दुकानातल्या खाजगी रिव्हॉल्व्हर मधून छातीत गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambag police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाची पोलीस चाचपणी (Inquiry) करत आहेत.

पुण्यातील (Pune) लक्ष्मी रोड (Laxmi Road) परिसरातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिकाची छातीत गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt to commit suicide by a famous goldsmith in Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रसिद्ध व्यवसायिक ज्वेलर्सचे मालक मिलिंद उर्फ बळवंत मराठे (Balwant Marathe) असं आहे. तसेच त्यांचे वयवर्ष ६० आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambag police) घटनास्थळी धाव घेतली. तसेच या प्रकरणाची पोलीस चाचपणी (Inquiry) करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद मराठे पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यवसायिक आहेत. लक्ष्मी रोड परिसरात त्यांचे मराठे ज्वेलर्सचे दुकान आहे. आज बुधवारी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास दुकानातल्या खाजगी रिव्हॉल्व्हर मधून छातीत गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कामगारांच्या सतर्कतेमुळे त्यांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मराठे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद

दरम्यान, मराठे यांनी इतके मोठे पाऊल कशासाठी उचलले, यामागील नक्की काय कारण आहे. या सर्व गोष्टींचा तपास पोलीस करत आहे. प्राथमिक माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये उद्भवलेल्या आर्थिक अडचण आणि नुकसान या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.