Attempted murder case against Raosaheb Danve's son-in-law and former MLA Harshvardhan Jadhav

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई तथा कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.  याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे.

जाधव यांच्या विरोधात पुण्यातील चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. एक किरकोळ अपघात प्रकरणावरुन झालेल्या भांडणात एका दांपत्याला मारहाण केल्याची तक्रार त्यांच्याविरोधात दाखल झाली.

हर्षवर्धन जाधवयांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या इषा झा यांच्याविरोधात ही तक्रार दाखल झाली.  अमन चड्डा या तरुणाने ही तक्रार दाखल केली होती. चड्डा यांचे आई-वडील दुचाकीवरुन औंध परिसरात जात असताना जाधव यांनी आपल्या चालत्या गाडीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे चड्डा यांच्या आईवडिलांना त्याचा धक्का लागला. चड्डा दांपत्याने जाधव यांना याचा जाब विचारल्यावर भांडण झाले. त्यावेळी आपली हृदयशस्त्रक्रीया झाली असल्याचे सांगून देखील जाधव व झा यांनी आपल्या आईवडिलांना मारहाण करत खुनाचा प्रयत्न केला असे चड्डा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना ते मनसे असा राजकीय प्रवास केल्यानंतर राजकारणातून सन्यास घेतला.