पिस्तुलातून गोळी झाडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; औंध येथील उद्योजक पिता – पुत्रावर गुन्हा

पिडीत विवाहिता उच्चशिक्षीत असून तिने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपी गायकवाड यांचे सुस येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर पती गणेशने पीडित विवाहितेला मारहाण केली. पिस्तुलातून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

    पिंपरी: पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलातून गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच विवाहितेचा छळ करण्यासाठी सासऱ्याने ही प्रोत्साहन दिले. याप्रकरणी औंध परिसरातील प्रसिद्ध उद्योजक बाप-लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षानंतर विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

    पती गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय ३६) आणि सासरा नानासाहेब शंकर गायकवाड (वय ७०, दोघे रा. औंध) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ मे २०१९ ते २४ जून २०१९ या कालावधीत घडला.

    पिडीत विवाहिता उच्चशिक्षीत असून तिने एमबीएपर्यंत शिक्षण घेतले आहे. आरोपी गायकवाड यांचे सुस येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर पती गणेशने पीडित विवाहितेला मारहाण केली. पिस्तुलातून गोळी झाडून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. विवाहितेवर अत्याचार करण्यासाठी सासरा नानासाहेब याने मुलाला प्रेरणा दिली. तसेच विवाहितेला काठीने मारहाण केली.

    आरोपी गणेश याच्याविरूद्ध काही दिवसांपूर्वी सुस येथील जमीन बळकावल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच २४ जून रोजी सांगवी पोलीसांनी या बाप-लेकावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. १७ जानेवारी २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२१ दरम्यान पिंपळे – निलख येथे सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारांना दमदाटी करुन, सुरक्षा रक्षकास मारहाण करुन काम बंद पाडले. तसेच साहित्य जबरदस्तीने नेवून, दहशत निर्माण केली. तसेच या बाप-लेकांनी कामगारांना जीवे मारण्याची धमकी देऊन पिस्तूलातून १० वेळा गोळीबार करण्याची धमकी दिली. महिला फौजदार सी. एम. बोरकर तपास करत आहेत.