उपासमारीला कंटाळून आत्महतेचा प्रयत्न

ओतूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग व्यावसाय बंद झाले आहेत.

 ओतूर येथील ग्रामस्थांनी दाखवली सतर्कता

ओतूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग व्यावसाय बंद झाले आहेत. मजुरीची कामे मिळेणात,अनेकांच्या हाताची कामे गेली. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यावर लॉकडॉऊनमुळे अक्षरश उपासमारीची वेळ आली आहे. अशातच न डगमगता रोजगाराच्या शोधात असलेल्या एका कुटुंबाने विहीरीत उडी मारुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेने या कुटुंबाला जीवदान मिळाले आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी भटकळवाडी येथे नुकतीच घडली. जुन्नर तालुक्यातील भटकळवाडी येथे घडलेल्या घटनेतून आला. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील विजय गुंजाळ हा शेतमजुर पत्नी रेश्मा गुंजाळ,दोन लहान मुली दिव्या(वय ३) व  तनुष्का(वय ६) यांच्या सह चार दिवसांपुर्वी आळेफाटा येथे काम शोधण्यासाठी आले होते. हे कुटुंब भटकळवाडी तालुका जुन्नर येथे रोजगाराच्या शोधात पायपीट करीत करीत आले होते. हे चार दिवसांपासून रोजगाराचा शोध घेत होते मात्र काहीही केल्या रोजगार नसल्याने या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या भुकेच्या व संघर्ष यातना सहन न झाल्याने या कुटुंबावर विहिरीत उडी मारून जीवन संपवण्याची वेळ आली. मंगळवारी(दि.२३) दोन मुलींना विहिरीत टाकून या दांम्पत्याने देखील विहिरीत उडी घेतली मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे या कुटुंबाला वेळीच मृत्यूच्या दाढेतून काढून इथे माणुसकीचे दर्शन घडून आले.  हे कुटुंब आई कोरणा संकट काळात हातचे काम केल्याने रोजगाराच्या शोधात पायपीट करीत फिरत होते. या कुटुंबाला एक वेळच्या जेवणाचीही कमावती त्यातूनच काम मिळणे कठीण झाले असल्याने टिचभर पोटासाठी पायपीट करीत हे कुटुंब चार दिवसापूर्वी जुन्नर तालुक्यामधील भटकळवाडी येथे आले होते. विहिरीतून बाहेर काढलेल्या कुटुंबाला आळेफाटा येथे डॉ.आवरी खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारसाठी नेेण्यात आले. येथील डॉ.आकाश अवारी यांना सदर प्रसंग सांगितल्यावर येथील डॉक्टरांनी या कुटुंबाची हालाखीची परिस्थिती जाणून घेऊन त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला.सध्या हे कुटुंब हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.