खोटी कागदपत्रे तयार करून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न; जाब विचारल्यावर कुटुंब संपविण्याची धमकी

मी गाववाला आहे, तुला माहिती नाही माझ्या पाठीमागे कोण कोण आणि किती मोठे हस्ती उभे आहेत, तू पोट भरायला आला आहेस, आम्ही गाववाला आहोत माझ्या नादी लागला तर जीवे मारून टाकेल आणि माझा नाद करून नये, असे काही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथील फ्लॅट दिला नाही, तर मला व माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून आल्याचे अरुण पवार यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे.

    पिंपरी: पिंपळे गुरव येथील एकाने फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून व खोट्या सही करून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच याबाबत विचारणा केली असता फ्लॅटधारकला व त्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    सांगवी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रार अर्जात बांधकाम व्यावसायिक अरुण पवार यांनी म्हटले आहे, पिंपळे गुरव येथील सचिन कवडे यांनी माझे व्यवसायिक भागीदार जीवन जाधव यांना सावकारी कर्जातून काही रक्कम दिलेली आहे. या व्यवहाराचा आणि माझा काही संबंध नाही. तरीही सचिन कवडे यांनी आमच्या विरुद्ध खोटी कागदपत्रे व बनावट सह्या करून शिवाजीनगर न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे. यावर आम्ही वकिलामार्फत आमची बाजू स्पष्ट केली आहे. सचिन कवडे हा सावकारी करतो, व्याजाने पैसे देतो, अशी त्याची वर्तणूक आहे.

    ‘मी गाववाला आहे, तुला माहिती नाही माझ्या पाठीमागे कोण कोण आणि किती मोठे हस्ती उभे आहेत, तू पोट भरायला आला आहेस, आम्ही गाववाला आहोत माझ्या नादी लागला तर जीवे मारून टाकेल आणि माझा नाद करून नये, असे काही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथील फ्लॅट दिला नाही, तर मला व माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून आल्याचे अरुण पवार यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्त, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगवी पोलीस ठाणे यामध्ये दाखल केला आहे. तरी सचिन कवडे याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अरुण पवार यांनी केली आहे.