रिक्षा चालक मालकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप

रिक्षाचालकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो यामुळे रिक्षाचालकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षासाठी, स्वतःचे लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या कुटुंबासह लसीकरण करून घ्यावे

    पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने शहरातील २५ हजार व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमात शहरातील ४५ वर्षावरील रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे.

    महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने चिखली येथील लसीकरण केंद्रावर रिक्षाचालकांना लस देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उल्हास जगताप बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोणा वाढत आहे, यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लसीकरण करणे आवश्यक आहे, यामध्ये शहरातील विविध संस्था संघटनांनी पुढे येऊन नागरिकांना शहरातील लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्याचे आव्हान करावे, यामध्ये रिक्षावाले असेन इतरही घटक असतील त्यांनी लसीकरण करून घेतल्यास आपले जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होईल.

    यावेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षाचालकांचा नागरिकांशी थेट संबंध येतो यामुळे रिक्षाचालकांना स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षासाठी, स्वतःचे लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालक मालकांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपल्या कुटुंबासह लसीकरण करून घ्यावे असे आवाहन बाबा कांबळे यांनी यावेळी केले. यावेळी कुंदन गायकवाड म्हणाले शहरातील हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब घटकांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने घेतला असून या उपक्रमांमध्ये सर्व विविध घटकांनी सहभागी होऊन लसीकरणाचा लाभ घ्यावा.

    यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवक कुंदन गायकवाड, सिकृत सदस्य दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त खोत, प्रभाग अधिकारी मोरे साहेब, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, विजय ढगारे, दीपक कुसाळकर, अविनाश जोगदंड, खालील मछंदार, अनिल शिरसाट, जाफर शेख, प्रदीप अय्यर ,तुषार लोंढे, दिलीप तापकीर उपस्थित होते.