बि.डी. काळे महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

भीमाशंकर: महाराष्ट्र राज्य महासंघ व विदयालयीन महासंघ यांच्या संयुक्त विदयमाने विविध प्रलंबित मागण्यांसाठी बी. डी. काळे महाविदयालय घोडेगाव येथील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांंनी (दि.२४) सप्टेंबर पासुन लेखनिबंद ठिय्या आंदोलन पुकारले आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत सरकार विरोधात आंदोलन छेडले जाणार असल्याचे कर्मचारी वर्गाने सांगितले. महासंघाच्या वतीने शासनाला अनेकदा निवेदने दिली असून शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचा-यांकडून होत आहे. महाविदयालयीन कर्मचा-यांना विविध मागण्यांसाठी अनेकदा राज्य सरकारला निवेदने देवूनही कर्मचा-यांच्या मागण्यांकडे सकारात्मक पाहण्यात आलेले नाही. दि. २४ पासून बी. डी. काळे महाविदयालय घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना पुर्नजीवित करणे यासह विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे.
सरकारने मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कर्मचा-यांनी दिला आहे. यावेळी अशोक काळे, गणेश काळे, विनोद काळे, विजया आस्वार, बाळासाहेब काळे, राजाराम सुर्यवंशी, ज्ञानेश्वर वायाळ, खंडू गुंजाळ, अनिल दरेकर, अनिल काळे, उदय नांगरे उपस्थित होते.