धामणी फाटा ते वैदवाडी फाटा रस्त्याची दुरावस्था

मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील धामणी फाटा ते वैदवाडी फाटा या रस्त्यावरुन अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबधित ठेकेदाराने रस्त्याची दुरुस्ती करावी.अशी मागणी पोंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.

धामणी फाटा-पोंदेवाडी मार्गे वैदवाडी फाटा या आठ किलोमीटरच्या रस्त्यावरुन  अष्टविनायक रस्त्याच्या कामासाठी अवजड वाहनांची वाहतुक होत असल्याने रस्ता खराब झाला आहे. सदर रस्त्याने अवजड वाहनांची वाहतुक अष्टविनायक रस्त्याचे काम घेतलेला ठेकेदार करत आहे.संबधित ठेकदाराने धामणी फाटा ते वैदवाडी फाटा रस्त्याचे काम केले आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती करावी.अशी मागणी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील आणि संबधित ठेकेदाराकडे पोंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.