onion

मंचर  : सुपेधर (ता.आंबेगाव) येथे कांद्याच्या बराकीतुन १० पिशवी कांदा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घोडेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित शेतक-यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाळुंगे तर्फे घोडा येथील शेतकरी दशरथ लक्ष्मण ढेरंगे यांनी सुपेधर येथे शेतामधील बराकीत कांद्याच्या १३ पिशव्या विक्रीसाठी नेण्यासाठी शुक्रवार (दि.२३) रोजी भरुन ठेवल्या होत्या.

मंचर  : सुपेधर (ता.आंबेगाव) येथे कांद्याच्या बराकीतुन १० पिशवी कांदा अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घोडेगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित शेतक-यांचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घोडेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाळुंगे तर्फे घोडा येथील शेतकरी दशरथ लक्ष्मण ढेरंगे यांनी सुपेधर येथे शेतामधील बराकीत कांद्याच्या १३ पिशव्या विक्रीसाठी नेण्यासाठी शुक्रवार (दि.२३) रोजी भरुन ठेवल्या होत्या. शनिवार (दि.२४) रोजी सकाळी ते सुपेधर येथील शेतामधील बराकीमध्ये गेले असता ३ कांद्याच्या पिशव्या दिसल्या. इतर १० कांद्याच्या पिशव्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुमारे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान दशरथ ढेरंगे यांचे झाले आहे. याबाबत घोडेगांव पोलिस ठाण्यात दशरथ ढेरंगे यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास पोलिस करत आहेत. ‌भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता  मंचर : आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाली असुन रुग्णसंख्या कमी झाली आहे. परिणामी प्रशासनावरील ताणही कमी झाला आहे. नागरिकांनी खबरदारी घेतली नाही तर भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. ‌आंबेगाव तालुक्यात एकुण रुग्णसंख्या ३ हजार ९९२ झाली आहे. आतापर्यंत एकुण ११० रुग्णांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात असून प्रशासनाने घेतलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.