बजाज ऑटोचा नवीन प्रकल्पः चाकणमध्ये कंपनी करणार ६५० कोटी रुपयांची गुंतवणूक

देशातील अव्वल दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेली बजाज ऑटो महाराष्ट्रातील चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ६५० दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने महाराष्ट्र सरकारबरोबर याबाबत सामंजस्य करार केला आहे. देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीत वाढ यासाठी कंपनीचा हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार २०२३ पासून या प्रकल्पाचे काम सुरू होईल. या युनिटमध्ये केटीएम, हुस्कुर्ना आणि ट्रायम्फ ब्रँडचे प्रीमियम युनिट्स तयार केले जातील. विशेष म्हणजे या प्रकल्पात कंपनी बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील तयार करणार आहे.

२०२० हे वर्ष वाहन उद्योगासाठी चांगले राहिले नसले तरी बजाज ऑटोची एकूण विक्री यंदा नोव्हेंबरमध्ये ५% वाढून ४,२२,२४० वाहनांवर गेली. नोव्हेंबर २०१९ मध्ये कंपनीने ४,०३,२२३ दुचाकींची विक्री केली.यंदा वर्षाअखेरीस कंपनीच्या एकूण मोटारसायकलची विक्री १२% वाढून ३,८४,९९३ वाहनांवर गेली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात ३,४३,४४६ वाहनांची होती.