बेकरीचालक दांम्पत्याची महिला पोलिसास शिवीगाळ

पुणे : बेकरी बंद करावयास लावली असता, बेकरी चालक दांम्पत्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. हा प्रकार धानोरी येथील केकवर्ड बेकरीमध्ये घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

पुणे :  बेकरी बंद करावयास लावली असता, बेकरी चालक दांम्पत्याने महिला पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली. हा प्रकार धानोरी येथील केकवर्ड बेकरीमध्ये घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलिस कर्मचारी कंगेल्लू यांनी फिर्याद दिली आहे.

महापालिकेने करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर व्यवहार सुरळीत करताना प्रत्येक व्यवसायास एक ठराविक वार ठरवून दिला आहे. घटनेच्या दिवशी बेकरी उघडण्याचा वार नव्हता. यामुळे गस्तीवर आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना बेकरी बंद करण्यास सांगितले. मात्र दांम्पत्याने बेकरी बंद करणार नाही असे म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक एस.एम.निकम करत आहेत.