‘बालभारती’ कडे ९८ हजार ९८८ पुस्तकांची मागणी

जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला पुस्तके मिळत असतात. परंतु, यंदा बालभारतीकडे पुस्तक छापाईला उशीर होत असल्याने पुस्तके वेळेत मिळण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शहर साधन केंद्रांतर्गत आकुर्डी केंद्रासाठी अनसुया वाघेरे इंग्रजी विद्यालय आणि कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय या शाळांमध्ये ही पुस्तके ठेवण्यात येतात.या केंद्राच्या अखत्यारितील शाळांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पुस्तके वितरित करण्यात येतात.

  पिंपरी : सर्व शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित आणि खासगी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्याथ्र्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शिक्षण विभागाने बालभारतीकडे ९८ हजार ९८८ पुस्तकांची मागणी केली आहे.

  जूनच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला पुस्तके मिळत असतात. परंतु, यंदा बालभारतीकडे पुस्तक छापाईला उशीर होत असल्याने पुस्तके वेळेत मिळण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात शहर साधन केंद्रांतर्गत आकुर्डी केंद्रासाठी अनसुया वाघेरे इंग्रजी विद्यालय आणि कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यालय या शाळांमध्ये ही पुस्तके ठेवण्यात येतात.या केंद्राच्या अखत्यारितील शाळांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात पुस्तके वितरित करण्यात येतात.

  माध्यम      पुस्तकांची मागणी
  मराठी             ४८२८७
  ————————
  इंग्रजी              १२२४५
  ————————
  हिंदी                २१८७४
  ————————
  उर्दू                  १६४८२
  ————————
  एकूण              ९८,९५५