अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा हताश !

पारगाव : निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे उभी पिके आडवी झाली आहे.विजेचे खांब,तारा वाकल्यामुळे अनेक गावांचा विजपूरवठा

पारगाव  : निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून बुधवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे उभी पिके आडवी झाली आहे.विजेचे खांब,तारा वाकल्यामुळे अनेक गावांचा विजपूरवठा खंडित झाला आहे.नानगांव ता.दौंड येथे बुधवार (ता.०३) रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती त्यामध्ये तरकारी पिकांचे व इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निसर्ग वादळ मुंबईच्या किनारपट्टीवर धडकल्या नंतर वार्याचा वेग कमी कमी होत गेला परंतु त्याची तीव्रता ग्रामीण भागाकडे जाणवली.दौंड तालुक्यातील नानागांव हे प्रगत बागायतक्षेत्र म्हणून नानगांव ची ख्याति आहे.भीमा नदी व जमिनिची पोत चांगली असल्याकारणाने येथील शेती ही नेहमी बहारदार असते. उस,कांदा, दोडका,वांगी,टोमॅटो, कारले,फ्लॉवर कोबी अशा अनेक पिकांची लागवड येथील शेतकरी करत असतात.

परिसरात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस व वादळी वारे यामुळे उभी पिके भुइसपाट होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या भागात बुधवारी मोठ्या प्रमाणात वारे वाहू लागले होते.यामुळे शेतातील उस,कांदा, सीताफळ, डाळीब,आंबा यासारख्या फळबागा तर कडवळ, मका,गवत,वैरण या जनावरांच्या चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

परंतु आधीच कोरोनाने बाजारपेठ ठप्प झालेली असताना या निसर्ग वादळाने व पावसाने या पिकांचे खुप मोठे नुकसान झाले आहे.आस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकरी वर्ग करत आहे.

"महसूल विभागाकडून शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत अजुन सूचना प्राप्त झालेल्या नाहीत"

          – व्ही. व्ही. बारवकर (कृषि सहायक)

"वादळी वारे व पावसाने तरकारी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी"

              – विनोद खळदकर (शेतकरी)