रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्ल्यांवर पर्यटनाला बंदी ; भोर प्रशासनाचा निर्णय

काही मद्यपी पर्यटक किल्ल्याचा पायथा रोड, टेकडी, धरणाचा बॅकवॉटर परिसरात मोकळ्या जागेत बसून मद्यपान करतात, अशा पर्यटकांचा त्रास स्थानिकांना होऊ नये, यासाठी काही काळासाठी तालुक्यांतील गड- किल्ल्यांवर पर्यटनास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश काढण्यात येणार असून पोलीस व स्थानिक ग्रामपंचायत ला देण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

    भोर: तालुक्यातील रायरेश्वर, रोहिडेश्वर या किल्ल्यांवर पर्यटकांना बंदी करण्याचा निर्णय तालुका प्रशासनाने घेतला असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. सध्या तालुक्यात पडलेल्या पावसाने डोंगररांगावर चढलेला हिरवळीचा साज व दाट धुके असे वातावरण यामुळे भोर व परिसरात पर्यटकांचा लोट येऊ लागला आहे. तोरणा किल्ल्यावर पर्यटकांनी केलेल्या उपद्रवामुळे वेल्हे तालुका प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी केली आहे. त्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा भोर तालुक्यातील रायरेश्वर रोहिडेश्वर भाटघर धरण, नीरा-देवघर धरण, महाड- रोड वरांधा घाट, मांढरदेव घाट कडे वळविला आहे.