बँकांच्या संपामुळे कोटींचा व्यवहार ठप्प, कामकाज बंद असल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप

या संपाला काल १५ मार्चपासून देशभरात सुरूवात झाली आहे. या संपात जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती.

    पुणे : देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी सरकारी धोरणांच्या विरोधात बँकांच्या खासगी करणामुळे दोन दिवसांचा संप पुकारला आहे. या संपाला काल १५ मार्चपासून देशभरात सुरूवात झाली आहे. या संपात जवळपास १० लाख कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. मुंबईसह प्रमुख शहरात सार्वजनिक बँकांची कार्यालये संपामुळे ओस पडली होती.

    बँकांची सेवा आणि कामकाज बंद असल्यामुळे सोमवारी तब्ब्ल १६ हजार ५०० कोटींचे चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. मुंबईत जवळपास ६५०० कोटींचे चेक, डीडी आणि पे ऑर्डर्सचे व्यवहार ठप्प झाले. तर राजधानी दिल्लीत ४८५० कोटींचे चेक व्यवहार रखडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. आज मंगळवारी १६ मार्चला सुद्धा बँक सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेचे कामकाज बंद असल्यामुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.