coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

काेराेना प्रतिबंधित लसीचे शहरात आजपर्यंत पंधरा लाखाहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. काेराेनाची परीिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू केले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. तर काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका ओळखून प्रशासनाकडून सावध पावले टाकली जात आहे.

    पुणे : काेराेनाचा संसर्ग वेगाने पसरवू शकणाऱ्या ‘सुपर स्प्रेडर’ घटकांना काेराेना प्रतिबंधित लस देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये दुकानदार, तेथील कर्मचारी, पथारी व्यावसाियक आदींचा समावेश आहे.

    काेराेना प्रतिबंधित लसीचे शहरात आजपर्यंत पंधरा लाखाहून अधिक डाेस देण्यात आले आहेत. काेराेनाची परीिस्थती नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लागू केले गेले आहेत. यापार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली जात आहे. तर काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा धाेका ओळखून प्रशासनाकडून सावध पावले टाकली जात आहे. काेराेनाचा संसर्ग वेगाने पसरवू शकतात, म्हणजेच जे नागरीक एकाच दिवशी अधिक व्यक्तींच्या संपर्कात येतात. अशा नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचा निर्णय महापािलका प्रशासनाने घेतल्याची माहीती अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

    दुकानदार, दुकानातील कामगार, पथारी व्यावसायिक , भाजी विक्रेते आदींना लस देण्याकरीता प्राधान्य दिले जाणार आहे. याकरीता अतिक्रमण विभागाला यादी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित नागरीकाला त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक दिवसाला शंभर जणांना लस देण्याचे नियाेजन केले आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. घराेघरी जाऊन लसीकरण करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाल्यानंतरच नियोजन करावे लागेल असेही त्यांनी नमूद केले.