बापरे: विनामास्क फिरण्यासाठी पुणेकर भरतात दिवसाला तब्बल ६ लाखांचा दंड

पोलिसांनी विनामास्क कारवाईचा वेग वाढविला. शहरातील विविध चौकात पोलीस विनामास्क जाणाऱ्यांवर अडवून कारवाई करीत आहेत.मात्र पोलिसांच्या दंडाच्या भीतीलाही न जुमानता लोक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत.

    पुणे: राज्यात सर्वत्र कोरोनाची लाट सुरू झाली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन कोरोना नियमांची पालन कारण्याचे आवाहन सातत्याने करत आहेत. मात्र या नियमांना पायदळी तुडवताना दिसत आहे. नियमी मोडून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस दण्डात्मकी कारवाई करत आहेत. शहरात विनामास्क फिरणाऱ्या पुणेकरांकडून पोलीस दिवसाला तब्बल ६ लाख रुपयांचा दंडवसूल करत आहेत. १९ मार्च अखेरपर्यंत २ लाख ५६ हजार ८२१ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून १२ कोटी ४४ लाख ११ हजार रुपये दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे.

    जानेवारी महिन्यापासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क कारवाईचा वेग वाढविला. शहरातील विविध चौकात पोलीस विनामास्क जाणाऱ्यांवर अडवून कारवाई करीत आहेत.मात्र पोलिसांच्या दंडाच्या भीतीलाही न जुमानता लोक सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत.

    शुक्रवारी १९ मार्च रात्री उशीरापर्यंत पोलिसांनी १ हजार ३६४ जणांकडून ५ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल केला आहे. त्याचवेळी ग्रामीण पोलिसांनी १ हजार ३९० जणांवर कारवाई करून ४ लाख ७४ हजार २०० रुपये दंड वसूल केला आहे.  शहरातील वाढत्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शहर पोलिसांनी विनामास्कची कारवाई २२ फेब्रुवारीपासून वाढविली. २२ फेब्रुवारी ते १९ मार्च दरम्यान पोलिसांनी २८ हजार २६१ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

    शहरातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मास्कने नाक व तोंड व्यवस्थित कव्हर होईल, याची काळजी घ्या. पोलीस कारवाईपेक्षा सर्वांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे ,असे मत , पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.