बापटांना पक्षात पत उरली नाही ; माजी आमदार मोहन जोशी यांची टीका

महाविकास आघाडी सरकारच्या विनंतीनुसार सीरम इन्स्टीट्युटने पुणे शहराला पंचवीस लाख लस देण्याची तयारी दाखविली. त्यासाठी केंद्र सरकारची परवानी मिळावी असे  कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी पुणे महापालिकेला पत्र पाठवून कळविले आहे. तरीही महापािलका प्रयत्न करीत नाही असा आराेप जाेशी यांनी केला.

    पुणे : ‘सीरम’कडून लस मिळत आहे, पण सत्ताधारी भाजप हे पुणेकरांच्या जीवाशी खेळत असल्याचा आराेप माजी आमदार माेहन जाेशी यांनी केला आहे. तसेच खासदार गिरीष बापट यांची पक्षात आणि  दिल्लीत पत उरली नसल्याची टिकाही त्यांनी केली आहे.
    पत्रकार परीषदेत जाेशी यांनी महापािलकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. ‘‘ कोविड प्रतिबंधक कोविशील्ड लस उत्पादन करणारी सीरम इन्स्टिट्यूट पुण्यासाठी २५लाख डोस देण्यासाठी तयार अाहे.  केंद्र सरकार परवानगी देण्यासाठी १५दिवस घोळ का घालत आहे? हा घोळबाजपणा म्हणजे पुणेकरांच्या जीवाशी खेळ असून, यामागे टक्केवारीचे राजकारण आहे की भाजपचा अंतर्गत कलह कारणीभूत आहे? असा सवाल जोशी यांनी केला आहे.
    महाविकास आघाडी सरकारच्या विनंतीनुसार सीरम इन्स्टीट्युटने पुणे शहराला पंचवीस लाख लस देण्याची तयारी दाखविली. त्यासाठी केंद्र सरकारची परवानी मिळावी असे  कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी पुणे महापालिकेला पत्र पाठवून कळविले आहे. तरीही महापािलका प्रयत्न करीत नाही असा आराेप जाेशी यांनी केला.  परवानगी  मिळविण्यात भाजपमधील अंतर्गत कलह कारणीभूत ठरत असुन, भाजपमध्ये गटबाजी चालू अाहे. पुण्याचे खासदार बापट हे लस मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाही , त्यांची दिल्लीतील आणि  पक्षातील पत कमी झाली आहे ? केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील पुण्याचेच असुनही परवानगी का दिली जात नाही असे जाेशी यांनी नमूद केले.