पुणेकरांना बाप्पा पावला! कोकणप्रवासात कोरोना चाचणीचे विघ्न झाले दूर

राज्यातील विविध ठिकाणांहून भाविक गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जातात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी जाताना अडथळे निर्माण होत आहेत. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तर १२ ऑगस्ट नंतर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक असल्याचीं सूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आली होती. परंतु आता पुणेकरांना गणपती बाप्पा पावला असून पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले आहे.

संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने होत आहे. तसेच दहीहंडीनंतर आता गणपती बाप्पाचं आगमन थोड्याच दिवसानंतर होणार आहे. मात्र कोरोनाचं सावट संपूर्ण देशात घोंघावत आहे. कोकणात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात. त्यामुळे कोकणवासीयांनी आता गावची वाट धरण्यास सुरूवात केली आहे. परंतु कोकणात जाताना ई-पास किंवा स्वॅब टेस्टिंग या दोन्ही गोष्टी बंधनकारक आहेत. मात्र अजून एक चांगली बातमी खास पुणेकरांसाठी आहे. पुणेकरांचा कोकणात गणशोत्सवासाठी जाण्याचा प्रवास विनाअडथळा असणार आहे.

गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक नसल्याचे पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी म्हटले आहे.   राज्यातील विविध ठिकाणांहून भाविक गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या मूळ गावी जातात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक गणेशभक्तांना आपल्या गावी जाताना अडथळे निर्माण होत आहेत. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी १० दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. तर १२ ऑगस्ट नंतर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कोरोनाची टेस्ट करणे बंधनकारक असल्याचीं सूचना राज्य सरकारकडून जारी करण्यात आली होती. परंतु आता पुणेकरांना गणपती बाप्पा पावला असून पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचे विभागीय आयुक्त राव यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे. मात्र पुणेकरांना का नाही. असा सवाल येथे उपस्थित होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी बंधनकारक नाही. मात्र, संबंधित नागरिकांना त्यांच्या भागातील पोलीस यंत्रणेचा परवाना आवश्यक आहे. तसेच हा परवाना घेताना गेल्या दोन आठवडय़ांमध्ये कोरोना संसर्ग न झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याचे सौरभ राव यांनी सांगतिलं आहे. तसेच गुरुवारपासून मुंबईसह, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी कुठल्याही भागातून कोकणात जायचे असल्यास कोरोना चाचणीचा अहवाल आवश्यक असल्याचे आपत्ती निवारण विभाग प्रमुख अभय यावलकर यांनी म्हटलं आहे.