पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा बारामती भाजपकडून निषेध ; बारामतीत कार्यकर्त्यांची निदर्शने

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हल्ले करत आहेत,भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, तसेच महिलांवर बलात्कार करणे, मृतदेह उलटे झाडाला लटकवणे असले घाणेरडे प्रकार घडत आहेत, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.

    बारामती: पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसाचाराचा बारामती शहर ‌व तालुका भारतिय जनता पक्षाच्या ‌वतीने निषेध करण्यात आला.कोरोनामुळे लॉकडाउन व संचारबंदी लागू असताना द बारामती मध्ये सोशल डिस्टन्सिंग व कायद्याचे पालन करून बारामती तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला हिंसाचार ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आज राज्यभर ठिकठिकाणी निदर्शने करीत आहेत. त्याचा भाग म्हणून बारामती शहर व तालुका भाजपच्या वतीने भारतीय जनता पार्टी कार्यालय तसेच बारामती तहसील कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हल्ले करत आहेत,भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे, तसेच महिलांवर बलात्कार करणे, मृतदेह उलटे झाडाला लटकवणे असले घाणेरडे प्रकार घडत आहेत, असा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.यावळी भाजपचे शहराध्यक्ष सतिश फाळके, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, पुणे जिल्ह्या सरचिटणीस अविनाश मोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गोविंद देवकाते, बारामती तालुका युवा मोर्चा अध्यक्ष ज्ञानेश्वर माने,रघु चौधर उपस्थित होते.