पवारांच्या बारामतीतील व्यापा-यांचा अप्रत्यक्षरीत्या केंद्राला सपोर्ट?  बंद फक्त साडेअकरापर्यंतच, शेतक-यांची नाराजी

बारामती : शेतकरी विधेयकाच्या विरोधात शेतकरी संघटनांनी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामती मधील व्यापारी महासंघाने फक्त नावालाच सहभाग घेतला असून मंगळवारी ( दि ८) सकाळी साडेअकरा पर्यंतच बंद पाळला आहे, त्यामुळे शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शेतकरी विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत आहे. देशातील तरुण पिढीनेही सोशल मिडियाच्या माध्यमातून “आम्ही शेतक-यांच्या बरोबर “असल्याचे प्रोफाईल फोटो पोस्ट करून पाठिंबा दिला आहे. मंगळवारी (दि ८)या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये महाराष्ट्रातील अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्या बारामतीत मात्र बारामती व्यापारी महासंघाने सकाळी ११.३० पर्यंत बंद पाळला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. वास्तविक पाहता बारामतीची बाजारपेठ शेतकरी वर्गावर अवलंबून आहे. असे असताना शेतक-यांसाठी किमान दिवसभर सर्व व्यापा-यांनी बंद मध्ये सहभाग घेण्याची आवश्यकता होती, मात्र साडेअकरा पर्यंत बंद ठेवून वरवरचा पाठिंबा बारामती व्यापारी महासंघाने दिला असल्याचे स्पष्ट होत असल्याचे अनेक शेतक-यांनी सांगून नाराजी व्यक्त केली.