जीवनात लायक व्हा, लोक आपोआप ‘लाईक’ करतील ; पोलीस आयुक्तांचा ‘लाईन बॉईज’ना कानमंत्र

पिंपरी :  युवा पिढी सोशल मिडिया आणि व्हच्र्युअल दुनियेत अधिक रमताना दिसत आहे. मात्र, खोटी प्रसिद्धी आणि मोठेपणा काही कामाचा नसतो. सोशल नेटवर्किंग साइटवर मिळणाऱ्या लाईक पेक्षा जीवनात लायक व्हा, लोक आपोआप लाईक करतील, असा कानमंत्र पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीसांच्या मुलांना दिला.

पिंपरी :  युवा पिढी सोशल मिडिया आणि व्हच्र्युअल दुनियेत अधिक रमताना दिसत आहे. मात्र, खोटी प्रसिद्धी आणि मोठेपणा काही कामाचा नसतो. सोशल नेटवर्किंग साइटवर मिळणाऱ्या लाईक पेक्षा जीवनात लायक व्हा, लोक आपोआप लाईक करतील, असा कानमंत्र पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीसांच्या मुलांना दिला.

पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय, महाराष्ट्र उद्योेजकता विकास केंद्र यांच्यावतीने पोलिस पाल्यांसाठी आयोजित उद्योजकता आणि तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण परिचय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृष्ण प्रकाश बोलत होते. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर, विभागिय अधिकारी सुदाम थोटे, सुरेश उमाप, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, सिटिझन फोरमचे मुख्य समन्वयक तुषार शिंदे आदी उपस्थित होते.

पोलिस कर्मचारी नेहमी जनसेवा आणि राष्ट्र सेवेत मग्न असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या पाल्यांना अधिक वेळ देता येत नाही ही वास्तवता निदर्शनास आणून देत कृष्ण प्रकाश म्हणाले, पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठे औद्योगिक क्षेत्र आहे. उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून पोलिसांच्या पाल्यांना स्वंयपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होता येणार आहे. परंतु, फक्त मार्गदर्शन मिळाले म्हणजे उद्योग यशस्वी होईल असे नाही. त्यासाठी चिकाटीने मेहनत करावी लागेल. स्पर्धात्मक जगात टिवूâन राहण्यासाठी कायम उद्यमशील रहायला हवे. नेहमी कार्यतत्पर राहून उद्योग सिद्धिस घेऊन जाता येतो, असेही कृष्ण प्रकाश म्हणाले. सोशल नेटवर्किंग साइटवर लाईक्स मिळवण्यासाठी युवा पिढी तासन्तास त्यावर वेळ घालवते. स्टेट्स सिम्बॉल आणि बडेजाव मिरवण्यासाठी वायफळ पैसा खर्च करू नका. त्यापेक्षा आयुष्यात एक ध्येय ठरवा आणि ते मिळवण्यासाठी भरपूर मेहनत घ्या, असा सल्लाही कृष्ण प्रकाश यांनी दिला.
. एमसीईडीचे कार्यकारी संचालक सुरेश लोंढे यांनी उद्योजकता प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश, स्वरुप आणि गरज समजावून सांगितली. उद्योग क्षेत्राला आणि नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असल्याचे ते म्हणाले. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी कार्यशाळेची पाश्र्वभूमी समजावून सांगितली. तुषार शिंदे यांनी सिटीझन फोरमचे योगदान आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली. सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी आपल्या प्रास्त्विकात कार्यशाळेचे स्वरूप व त्याच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. पोलीस निरीक्षक विवेक लावंड, सुधाकर काटे यांनी नियोजन केले. सुत्रसंचालन रत्ना दहिवलकर यांनी केले.