पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारहाण ; पोलीस तपास सुरु

न्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रवी याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपी दिनेश आणि धनवंत या दोघांनी हाताने, लोखंडी रॉडने, बांबूने आणि फरशीने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी: जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी तरुणाला रॉड, बांबू आणि फरशीने बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे घडली. नवीन मुकेश बेद (रा. सुभाषनगर, पिंपरी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रवी बेहनवाल (वय ३०), दिनेश बेहनवाल (वय १९), धनवंत बेहनवाल (वय ३३, सर्व रा. सुभाषनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फिर्यादी नवीन पिंपरी येथील झुलेलाल मंदिरात दर्शनासाठी गेले होते. ते दर्शन घेऊन मंदिराबाहेरील रस्त्यावर आले असता आरोपींनी त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी रवी याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच आरोपी दिनेश आणि धनवंत या दोघांनी हाताने, लोखंडी रॉडने, बांबूने आणि फरशीने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.