भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरूणाला मारहाण

नुरागने विकासचा मित्र घाटोळे याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी विकासने भांडणात मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपी अनुराग याने विकासला शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जखमी केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तपास करत आहेत.

    पिंपरी: भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणास सिमेंटच्या गट्टूने मारहाण करण्यात आल्याची घटना इंदीरानगर, चिंचवड स्टेशन येथे घडली. विकास कांतीलाल मोरे (वय २१) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनुराग दत्ता दांडगे (वय १९, दोघे रा. इंदीरानगर, चिंचवड स्टेशन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

    २६ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी मोरे आणि त्याचा मित्र आदित्य घाटोळे हे दोघेजण आशिष याच्या किराणा दुकानातून माल घेत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी अनुरागने विकासचा मित्र घाटोळे याला मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी विकासने भांडणात मध्यस्थी केली. याचा राग आल्याने आरोपी अनुराग याने विकासला शिवीगाळ करत सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जखमी केले. सहायक पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तपास करत आहेत.