भांडण सोडवायला आलेल्याला मारहाण

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे बहिण आणि तिचा पती यांच्यामध्ये चाललेले भांडण सोडवायला गेल्याने बहिणीच्या पतीने मेहुण्याला लोखंडी कलथ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी

मंचर  : आंबेगाव तालुक्यातील मंचर   येथे बहिण आणि तिचा पती यांच्यामध्ये चाललेले भांडण सोडवायला गेल्याने बहिणीच्या पतीने मेहुण्याला लोखंडी कलथ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रोहिदास डामसे यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर सोमाजी कोरके हे आपल्या कुटुंबासह मंचर येथे राहत असून  गेल्या सहा महिन्यापासून त्यांची बहीण व भाचे त्यांच्या समवेत राहत आहे. सोमवार (दि.२२ ) कोरके घरी असताना त्यांचा मेहुणा रोहिदास डामसे हा घरी आला व किचनमध्ये काम करत असलेल्या शंकर कोरके यांच्या बहिणीकडे जाऊन जोरजोरात भांडणे करु लागला.भांडणे  सोडवण्यासाठी  शंकर कोरके हे गेले असता त्यांच्या बहिणीच्या पतीने रागाच्या भरात किचनमध्ये असलेला लोखंडी कलथा मारला.तसेच शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत शंकर सोमाजी कोरके यांनी रोहिदास गणपत डामसे (रा.मंचर) याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान गणेश डावखर करत आहे.