मित्रामित्रांमध्ये केली मारहाण ; दोघांविरोधात गुन्हा दाखल

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे २६ वर्षीय तरुणाला शिवी दिला का असे विचारुन त्याच्याच मित्रांनी मारहाण केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज कैलास बाणखेले (वय २६) यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज बाणखेले हा खाजगी कामासाठी बाहेर गेला होता.तो त्याच्या पल्सर गाडीवर घरी येत असताना रात्रीच्या सुमारास मोरडेवाडी केनॉल रोडवर त्याच्या ओळखीचा विजय मोरडे राहणार मोरडेवाडी त्याला भेटला. विजय मोरडे याने सुरज बाणखेले यास मोरडेवाडी पुलावर सोड असे म्हणाला. त्यावेळी सुरज बाणखेले यांनी विजय मोरडे यांना पुलाजवळ सोडले असता त्या ठिकाणी जयहिंद मोरडे हा बसलेला होता.जयहिंद मोरडे याने तु मोरडें यांना शिवी दिली होती का असे म्हणुन सुरज बाणखेले यांस शिविगाळ करत हाताने लाथाबुक्यांनी व हातातील फायटरने तोंडावर,नाकावर मारहाण केली. विजय मोरडे याने तेथे पडलेली लाकडी काठी घेवुन अंगाखांद्यावर, हातावर मारहाण केली.विजय मोरडे याने तुला जिवंत सोडणार नाही. तुझा मर्डर करुन केनॉल मध्ये टाकुन देतो.अशी धमकी देवुन तेथुन पळुन गेले. सदर घटनेबाबत सुरज कैलास बाणखेले यांनी जयहिंद मोरडे व विजय मोरडे यांच्याविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान गणेश डावखर करत आहे.