माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह…

राज्यात माऊलींची वारी सूरु झाली असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका आज (२ जुलै) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल २२ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    आळंदी : राज्यात माऊलींची वारी सूरु झाली असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका आज (२ जुलै) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल २२ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

    दरम्यान त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापूर्वी एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी पालखी रद्द करण्यात आली होती. १० मानाच्या पालख्या बसन घेऊन जाण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी यांची दोन दिवस कोविड – १९ ची चाचणी करण्यात आली आहे.

    कोविड चाचणी नंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर एकूण २२ सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.