honey trap

तक्रारदार तरूण मांजरी परिसरात राहतो. त्याची आरोपी तरूणीसोबत इंस्ट्राग्रामवर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्या मैत्री झाली. त्यावेळी तिने तरूणाला उरुळी कांचन येथे भेटण्यास बोलावले. भेट झाल्यानंतर त्यांना एकांतात भेटण्याचीव्यवस्था ऋतुराज कांचनने केली. तक्रारदार तरूणीला जबरदस्तीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरूणीने तौफिक शेख व इतर साथीदारांना बोलावून घेतले.

    पुणे : पुण्यात हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून लुटल्याच्या दोन घटना समोर आल्यानंतर आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, हडपसर भागातील एका तरूणाला या टोळीने हनीट्रॅपमध्ये अडकवून २० लाख रुपये उकळले आहेत. हा प्रकार १५ ते २० ऑक्टोंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी तौफिक शेख, मंगेश कानकाटे, शुभम कानकाटे, साईराज कानकाटे, ऋतुराज कांचन, बंटी आमले, प्रतिक लांडगे, एक तरूणी, तिचा भाऊ व इतर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २० वर्षीय तरूणाने तक्रार दिली आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी परिसरात राहतो. त्याची आरोपी तरूणीसोबत इंस्ट्राग्रामवर ओळख झाली होती. ओळखीनंतर त्यांच्या मैत्री झाली. त्यावेळी तिने तरूणाला उरुळी कांचन येथे भेटण्यास बोलावले. भेट झाल्यानंतर त्यांना एकांतात भेटण्याचीव्यवस्था ऋतुराज कांचनने केली. तक्रारदार तरूणीला जबरदस्तीने शरीरसंबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर तरूणीने तौफिक शेख व इतर साथीदारांना बोलावून घेतले. त्याला मारहाण केली व त्याच्याकडील ३ हजार रुपये काढून घेतले. तर, गाडीत घालून यवत पोलीस ठाण्याच्या समोर नेले. तेथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवत गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोडअंती त्याच्याकरून २० लाख रुपये घेतले. तरूणाने बदनामीच्या भितीपोटी पोलीसांकडे तक्रार दिली नव्हती. पण, त्याने दोन दिवसांपुर्वी पोलीसांकडे तक्रार केली. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.