सावधान! नोकरीच आमिष पडतंय तरुणांना महागात! ; नोकरीच्या आमिषाने तरुणाची २२ लाखांची फसवणूक

संतोष सुयस सुतार (रा. शितलबाग सोसायटी, भोसरी), ज्ञानेश्वर धनवडे (रा. खारघर, नवी मुंबई), विलास गोपाळ गमरे (रा. सिद्धार्थनगर, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय सदानंद शेळके (वय ४९, रा. आरडे, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन २०१८ पासून १५ जानेवारी २०२० या कालावधीत घडला.

    पिंपरी :  नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांनी २१ लाख ९५ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन दोघांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. २८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना भोसरी येथे घडली.

    संतोष सुयस सुतार (रा. शितलबाग सोसायटी, भोसरी), ज्ञानेश्वर धनवडे (रा. खारघर, नवी मुंबई), विलास गोपाळ गमरे (रा. सिद्धार्थनगर, ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विजय सदानंद शेळके (वय ४९, रा. आरडे, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार सन २०१८ पासून १५ जानेवारी २०२० या कालावधीत घडला. आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी शेळके यांचा मुलगा संकेत (वय २४) आणि भाचा निलेश पुंडलिक मोरे (वय २४, रा. मोईपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे) यांना नोकरी लावतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर शितलबाग, भोसरी येथे शेळके यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. त्यानंतर १२ लाख ९५ हजार रुपये बँक खात्यावरून घेतले. एकूण २१ लाख ९५ हजार रुपये घेऊनही त्यांच्या मुलगा आणि भाच्याला नोकरी न लावता फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.