फेसबुकवर मैत्री करताना सावधान! महिलेची पावणेपाच लाखाची फसवणूक

डॉ. फिलीप लियो याच्यासह दोघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ एप्रिल ते १६ जून २०२१ या कालावधीत घडला. आरोपी डॉ. फिलीप लिओ याने महिलेशी  फेसबुकवर मैत्री केली.

    पिंपरी : महिलेला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. अनोळखी व्यक्तींनी महिलेचा विश्वास संपादन करून तिची ४ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला.

    डॉ. फिलीप लियो याच्यासह दोघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ४७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ एप्रिल ते १६ जून २०२१ या कालावधीत घडला. आरोपी डॉ. फिलीप लिओ याने महिलेशी  फेसबुकवर मैत्री केली. तसेच महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ४ लाख ७० हजार रुपये घेतले. घेतलेले पैसे परत न करता आरोपीने महिलेची फसवणूक केली. हे पैसे आरोपीने दोन बँक खात्यांवर घेतले आहेत. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.