पुणेकरांनाे सावधान! पुन्हा काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ ; गेल्या चाेवीस तासांत २८३ नवीन रुग्ण

सध्या शहरांत २ हजार ३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ३३१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, ४६४ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकूण ४ लाख ७६ हजार ४९३ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६५ हजार ५६९ रुग्णंानी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ५४९ जणांचा मृत्यू झाला आहे.

    पुणे : पुणेकरांनाे सावध व्हा ! गेल्या दीड महिन्यात प्रथमच काेराेनामुक्त हाेणाऱ्यांपेक्षा काेराेनाबाधितांचा आकडा नवीन रुग्णांच्या तुलनेत जास्त आढळून आला आहे. गेल्या चाेवीस तासांत २८३ नवीन रुग्ण आढळून आले आहे, तर २५५ रुग्ण काेराेनामुक्त झाले आहे.

    गेल्या चाेवीस तासांत शहरातील सात जणांसह एकूण १६ रुग्णांचा मृत्यू झाला आ हे. तर पाच हजार ४३७ रुग्णांची चाचणी केली गेली. यात २८३ रुग्ण काेराेना बाधित आढळून आले आहे. काेराेनाची लाट ओसरू लागल्यानंतर दीड महीन्यापासून नवीन काेराेना बाधित रुग्णांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या अधिक आढळून येत हाेती. परंतु बुधवारी काेराेनाबाधितांची संख्या काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या संख्येच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. यामुळे पुणेकरांनी सावध हाेण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.